Home अहमदनगर अहमदनगर: महिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या

अहमदनगर: महिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या

Godavari River Suicide: गोदावरी नदीपात्रात (Ahmednagar) लहान पुलावरून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Woman commits suicide by jumping into Godavari river

कोपरगाव: गोदावरी नदीपात्रात लहान पुलावरून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. काल शनिवारी तिचा मृतदेह राहता तालुक्यातील रास्तापूर शिवारात गोदावरी नदीपात्रात आढळून आला. नीता संतोष जपे वय ३२ असे मयत विवाहित महिलेचे नाव नाव असून ती कोपरगाव तालुक्यातील मोहिनीराज नगर येथील रहिवासी होती.

राहाता तालुक्यातील रस्तापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचा नदीकाठी अनेक ठिकाणी शोध सुरू होता. रबरी बोट नदीच्या पाण्यात उतरवतही शोध घेण्यात आला होता मात्र यश येत नव्हते मात्र काल नदीकाठी असणार्‍या एका ग्रामस्थांना सदर मृतदेह आढळून आला असता त्यांनी कोपरगाव येथील माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड यांना कळविले. त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

नातेवाईकांनी खात्री केली असता सदर मृतदेह नीता जपे हिचाच असल्याची खात्री झाली. राहाता पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Woman commits suicide by jumping into Godavari river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here