Home अहिल्यानगर अहिल्यानगर: वादळाचे थैमान, बैलगाडीवर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर: वादळाचे थैमान, बैलगाडीवर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Heavy Rain: जोरदार घोगावणार्‍या वार्‍याने व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील घरे, पीकांचे मोठे नुकसान.

Woman dies after tree falls on bullock cart in storm

शेवगाव: तालुक्याच्या काही भागात वादळी वार्‍याने बुधवार (दि.11) सायंकाळी अक्षरशः थैमान घातले. जोरदार घोगावणार्‍या वार्‍याने व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील घरे, पीकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर काही ठिकाणी मोठमोठी वृक्षच उन्मळून पडली. दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. वादळात बैलगाडीवर झाड कोसळ्याने बैलगाडी असणार्‍या एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य घटनेत तिघे जबर झाले आहेत.

बुधवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या तालुक्यातील अनेक भागात दरम्यान अचानक वातावरणात मोठा बदल झाला. त्यानंतर प्रचंड ढग दाटून आले, हे वातावरण पाहताच शेतकरी व नागरिकांची पळापळ सुरु झाली आणि काही वेळातच वादळ व पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. वादळी वारे वेगाने वाहत असल्याने सर्वच मार्गावरील अनेक झाडे उन्मळुन पडली. दहिफळ येथे बैलगाडीवर झाड पडल्याने मिराबाई अशोक भोसले (वय 57) या महिलेचा मृत्यु झाला. तसेच ओंकार भोसले (वय 15), विराज भोसले (वय20), मुक्ता भोसले (वय 33) हे तिघे जखमी झाले आहेत. हे शेतकरी वादळी पाऊस सुरु झाल्याने शेतातून बैलगाडीत आपल्या घरी परतत असताना अचानक बैलगाडीवर झाड पडल्याने हि दुर्घटना घडली आहे.

तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरात वादळ व पावसाने दानादन उडविली. यामध्ये 100 पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि तारी तुटल्या, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या, कांद्याचे शेडमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तर अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेले.सोलर प्लेटाचे ही मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेवगाव शहरात व तालुक्यातील फलकेवाडी, अमरापुर, आव्हाणे, ढोरजळगाव, खुंटेफळ, दहिफळ, शहरटाकळी, आखेगाव, सालवडगाव, खरडगाव, देवटाकळी, हिंगणगावने, भावीनिमगाव, दहिगावने, मजलेशहर, बक्तरपुर, भायगाव, मठाचीवाडी भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. तर अनेक घरांचे पत्रे उडाले, तर अनेक घरांची पडझड झाली. भावीनिमगाव, दहिगावने, रांजणी येथे अनेक शेतकर्‍यांची केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे. रांजणी, दहिगावने, भावीनिमगाव येथील अनेक शेतकर्‍यांच्या काढणीला आलेल्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मठाचीवाडी मजलेशहर रस्ता तसेच सुकळीते शहरटाकळी रस्ता झाडे पडल्यामुळे दुपारपर्यंत बंद झाला होता.

शहरटाकळी येथील पंकज पंडित व राजेंद्र बोरुडे यांच्या चार चाकी कारवर झाडे पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरटाकळी, देवटाकळी, मजलेशहर, सुलतानपूर परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. शेवगाव वरून येणार्‍या मेन लाईन वर अनेक ठिकाणी तारावर झाड कोसळले असल्याने वीज पुरवठा गेल्या 24 तासापासून बंद आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे यांनी सांगितले. दहिगावने परिसरात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी झालेल्या केळी पिकाचे व पडझड झालेल्या घराची पाहणी करून कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना तात्काळ पंचनामे करण्याचे सांगितले आहे.

Breaking News: Woman dies after tree falls on bullock cart in storm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here