Home Accident News अहमदनगर: पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

अहमदनगर: पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Woman dies in rear-end collision Accident

नेवासा: नगर तालुक्यातील इमामपूर येथे झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी संभाजी भीमराज मिसाळ हे सोमवार दि. २० मे रोजी पत्नी मनीषा संभाजी मिसाळ (वय ४२ वर्षे) हिला घेऊन नगर येथे दवाखान्यात गेले होते. दवाखान्यातील काम आटोपून संभाजी व पत्नी मनीषा हे दुचाकीवरून भेंड्याकडे येत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास अ.नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर गावाच्या कमानीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धड़क दिल्याने झालेल्या अपघातात मनीषा ही रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. पती संभाजीने तिला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तेथे शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा भेंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीषा यांच्या पश्चात सासू-सासरे, पती, मुलगा, मुलगी, दीर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. ज्येष्ठ नागरिक भीमराज मिसाळ यांच्या त्या सून, संभाजी मिसाळ यांच्या पत्नी तर शिवाजी मिसाळ व त्रिंबक मिसाळ यांच्या भावजयी होत.

Web Title: Woman dies in rear-end collision Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here