Home ठाणे मॉल परिसरात सेक्स रकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, दोन अभिनेत्रीची सुटका

मॉल परिसरात सेक्स रकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, दोन अभिनेत्रीची सुटका

Sex Racket Thane: हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक, तावडीतून मराठी, हिंदी वेब सिरीज, मालिका तसेच अल्बममध्ये सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणींची सुटका.

woman was arrested for running a sex racket in the mall area

ठाणे: येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. तिच्या तावडीतून हिंदी मालिका तसेच वेबसिरीजमध्ये भूमीका निभावणाऱ्या दोन कलाकार (अभिनेत्री) तरुणींचीही पोलिसांनी सुटका केली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सिने वंडर मॉल तळ मजला, डॉमिनोज रेस्टॉरंट येथे एक महिला काही तरुणींना शरीर विक्रयासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट गि-हाईक पाठवून सापळा लावला. या प्रकाराची खात्री झाल्यानंतर तिच्या तावडीतून मराठी, हिंदी वेब सिरीज, मालिका तसेच अल्बममध्ये सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणींची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. या दलाल महिलेविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात पिटा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन मुलींना मानपाडा, ठाणे येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: woman was arrested for running a sex racket in the mall area

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here