Home औरंगाबाद चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराला विवस्त्र करून संपवलं

चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराला विवस्त्र करून संपवलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केली, यामध्ये ओळखीच्या लोकांच्या मदतीने या महिलेने प्रियकराला विवस्त्र करून बेदम मारहाण.

woman who lived in a 'live-in' for four years ends by stripping her boyfriend

छत्रपती संभाजीनगर: शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केली, यामध्ये ओळखीच्या लोकांच्या मदतीने या महिलेने प्रियकराला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला शहरातील साई टेकडी परिसरात फेकून दिले होते. दुसऱ्या दिवशी लोकांना मृतदेह आढळून आल्यावर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.आनंद साहेबराव वाहुळ (वय 27 वर्षे,  रा. कबीरनगर, उस्मानपुरा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  “आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचे एका 45 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते आणि ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र, मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला आणि येताच महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळा माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याला ही बाब कळेल, वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली. मात्र, तरी आनंद ऐकत नव्हता.”

चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने आनंदला आता यापुढे आपल्याला एकत्र राहता येणार नसल्याचे सांगितले. तसेच, मला सोडून दे अशी विनंती देखील केली. पण, आनंदला हे मान्य नव्हते. शेवटी महिला व तिचा मुलगा व अन्य तीन आरोपींनी 13 डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. तर, साई टेकडी परिसरात ईव्हीनिंग वॉकिंगला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळल्याने त्यांनी तात्काळ चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: woman who lived in a ‘live-in’ for four years ends by stripping her boyfriend

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here