Home अहमदनगर तु मला आवडतेस असे म्हणत महिलेचा विनयभंग

तु मला आवडतेस असे म्हणत महिलेचा विनयभंग

woman's molestation by saying you like me

Rahata | राहता: राहता तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तु मला आवडतेस असे म्हणत तिचा हात धरत लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करणाऱ्या रामपूरवाडी येथील चांगदेव मच्छिंद्र काथे याच्याविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ मार्च रोजी घटना घडली असून ३१ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आरोपी चांगदेव मच्छिंद्र काथे फिर्यादीच्या घरात येऊन म्हणाला की, तु मला आवडतेस तु माझ्या बरोबर राहिली तर तुला कामाला जायची गरजच पडणार नाही. मी तुझे सारे पाहीन असे म्हणून त्याने फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग (molestation) केला तसेच यावेळेस तुझी मुलगी व जावई आला म्हणून तु वाचलीस तुला पुढच्या वेळेस कोण सोडवितो ते पाहतोच अशी धमकी देऊन आरोपी निघून गेला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून काथे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: woman’s molestation by saying you like me

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here