अहमदनगर ब्रेकिंग! स्वतः वर केले ब्लेडने वार करीत तरुणाने संपविले जीवन
Breaking News | Ahmednagar: तरुणाने आपल्याच हाताने गळ्यावर तसेच पोटावर धारदार ब्लेड पानने वार केल्याची घटना घडली असून यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
कोपरगाव: कोपरगाव शहरातील उपनगरात असलेल्या संजयनगर भागात राहणाऱ्या संजय लक्ष्मण आल्हाट (वय ३६ वर्ष) याने आपल्याच हाताने गळ्यावर तसेच पोटावर धारदार ब्लेड पानने वार केल्याची घटना घडली असून यात त्याचा मृत्यू झाला आहे.
संजय लक्ष्मण आल्हाट हा ३६ वर्षीय तरूण शहरातील उपनगर असलेल्या संजयनगर भागात राहत असून त्याने कोणतेही कारण कळू न देता आपल्या स्वतःच्या हाताने गळ्यावर तसेच पोटावर ब्लेड पानने वार केल्याची घटना घडली. त्यात त्याच्या शरीरातून अति रक्तस्राव झाला ही माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड. कॉ. ए. एम. दारकुंडे करत आहेत.
Web Title: young man ended his life by stabbing himself with a raised blade
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study