प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्याकडून तरुणाचा खून

    Breaking News | Crime:  भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे तरुणाचा निर्घृण खून(Murder)

    Young man is killed by his brother-in-law out of anger for having a love marriage

    तासगाव : भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे सावळज (ता. तासगाव) येथील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. भारत ऊर्फ संतोष संजय पाटील (वय २९) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

    प्रेमविवाहामुळे चिडून संतोषचा मेहुणा ओंकार शिवाजी पाटील याने खून केल्याचे मृताची आई वैशाली संजय पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ओंकार आणि अन्य नातेवाईकांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष हा ट्रॅक्टरचालक होता. सावळज बिरणवाडी रस्त्यावरील मळ्यात कुटुंबासह तो राहात होता. बुधवारी सायंकाळी तो घरातून बाहेर गेला होता. पण रात्री तो उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संतोष जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला पाठीमागे जोराचा आघात झालेला होता. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात हलविले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी संतोष जखमी आढळला, त्याठिकाणी त्याची दुचाकी होती. हल्लेखोराने त्याच्या डोक्यात, पाठीमागे मारल्याने डोक्यात मोठी जखम होती.

    विवाह संतोष याने भावकीतीलच एका मुलीशी अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यावेळेपासून या दोन कुटुंबांत कटुता आहे. त्यातूनच ही घटना घडली का, याशिवाय खुनामागे अन्य काही कारण आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.

    Web Title: Young man is killed by his brother-in-law out of anger for having a love marriage

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here