Home अहमदनगर दुधवाल्या तरुणाने तु मला खूप आवडतेस म्हणत विवाहित तरुणीचा विनयभंग  

दुधवाल्या तरुणाने तु मला खूप आवडतेस म्हणत विवाहित तरुणीचा विनयभंग  

young man molestation with milk says that he loves me very much

Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारात दुध घालणाऱ्या तरुणाने तरुण विवाहितेचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना ३ जून रोजी घडली. घरोघर जाऊन दूध घालणार्‍या तरूणाने दूध देत असताना एका 27 वर्षीय विवाहित तरूणीचा हात धरुन तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

याप्रकरणी विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की,  दि. 3 जून रोजी यातील आरोपी किरण उर्फ रवींद्र अरूण ढोकणे, रा. उंबरे, ता. राहुरी हा महिलेच्या घरी दूध घालण्यासाठी गेला. ती विवाहित महिला तिच्या घरासमोर आरोपी ढोकणे याच्याकडून दूध घेत असताना त्याने तिचा हात धरला. तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्यावेळी तिने हा प्रकार सासू-सासर्‍यांना सांगितला. त्यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाला फोनवरुन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या विवाहित तरूणीचे सासू-सासरे व दीर यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यास विचारले, तू माझ्या वहिनीचा हात का धरला? असे म्हणाला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन, तुमची लायकी आहे का? माझ्या घरी यायची? असे म्हणून त्याने तरूणीच्या दिराला दगडाने मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर त्या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किरण उर्फ रवींद्र अरूण ढोकणे याच्या विरोधात विनयभंगाचा तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: young man molestation with milk says that he loves me very much

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here