Home अहमदनगर अहमदनगर: शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला तरूणाचा मृतदेह

अहमदनगर: शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला तरूणाचा मृतदेह

Breaking News | Ahmednagar: एका शेतात अंदाजे 35 वर्ष वयाच्या तरूणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.

young man's dead body was found in the field

अहमदनगर:  नगर- मनमाड महामार्गालगत देहरे (ता. नगर) येथील टोलनाक्याजवळील एका शेतात अंदाजे 35 वर्ष वयाच्या तरूणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह काल, शुक्रवारी सकाळी आढळून आला आहे.

मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला आहे. देहरे टोलनाक्याजवळ दादा दामोधर करंडे यांच्या शेतात हा अनोळखी मृतदेह सकाळी नऊच्या सुमारास आढळून आला.

या परिसरात शेती असलेले कचरू गणपत करंडे हे शेतकरी सकाळी त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी जात असताना दादा करंडे यांच्या शेतात सोयाबीनच्या पिकात पडलेला मृतदेह त्यांना दिसून आला. ही माहिती त्यांनी पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार यांना सांगितली. खजिनदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना ही माहिती कळविली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मोंढवे, पोलीस अंमलदार भास्कर मिसाळ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर रूग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला असून या वयाचा कोणी तरूण बेपत्ता झाल्याची नोंद नगर जिल्ह्यातील कुठल्या पोलीस ठाण्यात दाखल आहे का याचा शोध घेतला जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्यावरच हा घातपात आहे की अन्य काही याबाबत माहिती मिळू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: young man’s dead body was found in the field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here