Home पुणे तुमच्या मुलाचा अन् पतीचा मृत्यू होईल… जादूटोण्याचा भयंकर प्रकार

तुमच्या मुलाचा अन् पतीचा मृत्यू होईल… जादूटोण्याचा भयंकर प्रकार

Breaking News | Pune: पैसे द्या नाहीतर तुमच्या घराचा नायनाट होईल, अशी महिलेला धमकी.

Your son and husband will die... terrible form of witchcraft

पुणे: पुण्यातील चंदन नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी त्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी व मुलाची आजारातून मुक्तता करण्यासाठी विश्वास संपादन करून चार जणांनी अघोरी विद्येचा बनाव केला आहे. सदर घटनेत ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  वैशाली गायकवाड या महिलेकडून ५ जणांच्या टोळक्याने तब्बल ३५ लाख रुपये उकळलेत. महिलेच्या घरातील अडचणींवर तोडगा काढणार असं सांगत त्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या नाहीतर तुमच्या घराचा नायनाट होईल, अशी धमकी त्यांनी महिलेला दिली.

नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पैशांसाठी पुढे महिलेचा मुलगा आणि पतीची हत्या करू असंही म्हटलं. तसेच महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. अघोरी विद्या करून जादूटोणा आणि मंत्राच्या साह्याने या ५ जणांनी आतापर्यंत ३५ लाख रुपये उकळलेत.

चारुदत्त मारणे असं यातील मुख्य आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.  अधिक तपास चंदन नगर पोलीस करीत आहे.

Web Title: Your son and husband will die… terrible form of witchcraft

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here