अहमदनगर ब्रेकिंग: तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar, Rahata Suicide Case: राहत्या घरात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

राहता: राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील संकेत शामराव गाढवे (वय 17 वर्ष) या तरुणाने राहात्या घरात मफलरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
मयत संकेत हा इयत्ता बारावीत शिकत होता. अत्यंत हुशार असलेला संकेत शांत स्वभावाचा होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपासात ते समोर येईल.
सदर घटनेची माहिती राहाता पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी पो. कॉ. कदम व पो. कॉ. दिलीप तुपे यांना घटनास्थळी पाठवून मयत संकेत याचा मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देऊन रांजणगाव येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संकेतच्या पश्चात आई, बहिण असा परिवार असून गणेश बाळासाहेब गाढवे यांच्या तक्रारीवरुन राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर 76/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. कदम हे करत आहे.
Web Title: Youth committed suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App
















































