Home महाराष्ट्र Rape | धक्कादायक: 12 वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

Rape | धक्कादायक: 12 वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

12-year-old girl rape in public toilet

पुणे | Pune Crime: पुणे शहर  हादरवणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका सार्वजनिक शौचालयात १२ वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे रेल्वे स्थानक ते माल धक्का दरम्यान असलेल्या सार्वजनिक शौचालयात ही धक्कादायक घटना घडली. १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

शौचालयाच्या आतमधील छोट्याशा भागात पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहत आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीनं तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexually Assault) केल आहे.  दरम्यान पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आणि त्यानंतर पीडित मुलीच्या आईने बंड गार्डन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी बंड गार्डन पोलीसांनी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगल्या ओळखीचा आहे. तो दरदिवशी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. मात्र हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: 12-year-old girl rape in public toilet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here