Home नागपूर प्राध्यापकाच्या आत्महत्येने खळबळ, मृतदेहाजवळ सापडली १४ पानांची सुसाईड नोट

प्राध्यापकाच्या आत्महत्येने खळबळ, मृतदेहाजवळ सापडली १४ पानांची सुसाईड नोट

Nagpur Suicide News: प्राध्यापकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना, महाविद्यालयातील सहकारी शिक्षक आणि त्यांच्या काही सदस्यांकडून छळ होत असल्याचा दावा.

14-page suicide note was found near the dead body of a professor

नागपूर:  नागपूर  येथील जीएस महाविद्यालयातील प्राध्यापकाने रविवारी (१० जुलै २०२३) संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्यापूर्वी प्राध्यापकाने १४ पानांची सुसाईड नोट लिहिली, ज्यात महाविद्यालयातील सहकारी शिक्षक आणि त्यांच्या काही सदस्यांकडून छळ होत असल्याचा दावा केला आहे. याबाबत पीटीआय वृत्त संस्थेने माहिती दिली असून बेलतरोडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

गजानन कराडे (वय, ४२) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यपकाचे नाव आहे. गजानन हे नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. तसेच जीएस महाविद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. रविवारी गजानन यांची पत्नी मुलाला घेऊन अमरावती येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेल्या होत्या. संध्याकाळी घरी परतल्यानंतर गजनान यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ १४ पानांची सुसाईट नोट सापडली. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, कराडे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. तसेच महाविद्यालयीन व्यवस्थापनातील सदस्य आणि काही प्राध्यापकांकडून होणाऱ्या छळाबाबत ते बोलत होते.

रविवारी संध्याकाळी कराडे यांनी आपल्या मेहुण्याला फोन करून अज्ञात व्यक्तींकडून आपल्यावर हल्ला होण्याची भीती असल्याचे सांगितले. कराडे यांनी आपल्या मेहुण्याला सांगितले की, त्यांनी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या डायरीत सर्व काही नोंदवले आहे आणि आपल्याला काही झाल्यास कारवाई करण्याची विनंती केली, असेही नातेवाईकांनी सांगितले.

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने कराडे यांच्या लिखाणाची डायरी कुटुंबीयांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची पुष्टी केली. डायरीत १४ पानांचे लिखाण असून त्यात काही व्यक्तींची नावे आणि इतर तपशील आहेत, असे त्यांनी सांगितले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: 14-page suicide note was found near the dead body of a professor

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here