Home क्राईम संगमनेर तालुक्यात भर दिवसा धाडसी चोरी, तब्बल 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल...

संगमनेर तालुक्यात भर दिवसा धाडसी चोरी, तब्बल 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल लंपास

Sangamner Crime:  शिबलापूर शिवारात सोमवारी भर दुपारी धाडसी चोरी, तब्बल 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना.

theft in Sangamner taluk in broad daylight, goods worth 4 lakh 60 thousand looted

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात सोमवारी भर दुपारी धाडसी चोरी झाली. संगीता भीमराज सांगळे यांच्या बंद घराची कडी उघडून 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी झालेला मुद्देमाल

यावेळी घरातील लोखंडी कपाटातून 80 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, 25 हजार रुपये किंमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 80 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 60 हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे कानातले, 20 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे कर्णफुले, 20 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच 55 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रार दाखल

याबाबत संगीता सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

Web Title: theft in Sangamner taluk in broad daylight, goods worth 4 lakh 60 thousand looted

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here