Home अकोले अकोलेतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक, पोलीस कोठडी

अकोलेतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक, पोलीस कोठडी

Akole Murder Case:  प्रेमसंबंध असल्याचे कारणावरून घरामध्ये गळा आवळुन खून केला व त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी उमेश याचे प्रेत घरापासुन काही अंतरावर असलेल्या बांधाच्या खाली टाकून देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

Three arrested in connection with the murder of a youth in Akole, police custody

अकोले:  तालुक्यातील सातेवाडी येथील उमेश कुशाबा मुठे या 30 वर्षीय युवकाचा प्रेम संबंधाच्या कारणाने गळा आवळुन खून केल्याची घटना आठवडा भरापूर्वी उघडकीस येऊनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी सातेवाडी ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. अखेर सोमवारी रात्री अकोले पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांनाही गजाआड केले आहे.

याबाबत अकोले पोलिसांत सावित्राबाई कुशाबा मुठे यांनी फिर्याद दिली असुन त्यात म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा उमेश कुशाबा मुठे याचे गावातील नात्यामधील एका महिलेशी दिड वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यामुळे मयत उमेश हा अधुन मधून तिच्या घरीच थांबत असायचा. तर उमेश हा 2 जुलै 2023 रोजी सकाळी 7 वाजता कामाला जातो म्हणून घरातून गेला. व संध्याकाळी दुकानमाळ येथे त्याची प्रेयसी हिच्यासोबत घरी गेला.

मुलगा उमेश मुठे हा तिच्या घरी असताना त्याची प्रेयसी व वाळीबा पांडुरंग दिघे, संपत बारकु मुठे या तिघांनी मिळून उमेश मुठे याचा प्रेमसंबंध असल्याचे कारणावरून घरामध्ये गळा आवळुन खून केला व त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी उमेश याचे प्रेत घरापासुन काही अंतरावर असलेल्या बांधाच्या खाली टाकून देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 442/2023 भारतीय दंड संहिता कलम 302, 201, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खैरनार, उपनिरिक्षक बाजीराव गवारे, पो. हे. कॅा. अनिल जाधव करत आहे.

Web Title: Three arrested in connection with the murder of a youth in Akole, police custody

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here