अहमदनगर: लग्नात अन्नातून दीडशे जणांना विषबाधा, वधु पित्याचा समावेश
Ahmednagar News: संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना.
शिर्डी: शिर्डी येथून जवळच काल रविवारी संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये वधू पित्याचाही समावेश आहे. या सर्वांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
शिर्डी नजीक रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला तर सायंकाळी मोठ्या थाटामाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूचे अनेक वर्हाडी तसेच नागरिक उपस्थित होते. भोजन केल्यानंतर दहा ते पंधरा जणांना पोटदुखी व उलट्या होण्याचा त्रास जाणू लागला होता तर रात्री आठ वाजे नंतर जवळपास दीडशेहून अधिक व्यक्तींना उलट्या, जुलाब व पोट दुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने अनेकांनी उपचार घेण्याकरिता हॉस्पिटलकडे धाव घेतली. वधू पित्याला देखील पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाला.
विवाह सोहळ्यात येणार्या नागरिकांना अचानक त्रास जाणू लागल्याने नातेवाईक व आयोजकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत विषबाधा झालेल्या नागरिक साईनाथ रुग्णालयात तसेच साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याकरिता येत होते. साईबाबा रुग्णालयात जवळपास पस्तीस तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे शंभरहुन अधिक व्यक्तींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले. यातील एकजण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्ण सामान्य विभागात आहेत. विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असून रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली.
Web Title: 150 people poisoned by food at the wedding
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App