Home अहमदनगर आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Ahmednagar News: आरोपीने तिला हाताला धरून घरी नेले व घराचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना. न्यायालयाचा निकाल : खटल्यामध्ये तपासले १२ साक्षीदार.

20 years hard labor for the accused in the case of abused of an eight-year-old girl

अहमदनगर: आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. अहमदनगर येथील अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी ही शिक्षा सुनावली.

अहमदनगरमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये ही घटना घडली होती. रशीद सरदार बेग (वय २८ वर्षे, रा. खोसपुरी, ता. जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी आठ वर्षीय चिमुरडी ही २४ सप्टेंबर २०२० रोजी तिच्या घरासमोरील ओट्यावर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला हाताला धरून घरी नेले व घराचा दरवाजा बंद करून अत्याचार केला. पीडित मुलीने त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपीने तिला हाताला घट्ट धरून ठेवले होते. घरी आल्यानंतर पीडित मुलीने घडलेली सर्व घटना आईला सांगितली. त्यावेळी पीडित मुलगी ही अत्यंत घाबरलेली होती. घडलेली सर्व परिस्थिती पाहता, पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, पीडितेची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक व महानगरपालिका व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, या घटनेमधील मुलगी ही केवळ आठ वर्षे वयाची आहे. घडलेल्या घटनेमुळे तिच्या मनावर अतिशय परिणाम झालेला आहे. ती इतर लोकांशी बोलण्यास धजावत नाही. चिमुरडीवर झालेली घटना ही समाजमनावर परिणाम करणारी आहे.

अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविणे ही प्रशासनासोबत कोर्टाचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आडसूळ, तसेच पोलिस कॉन्स्टेबल भगवान वंजारे यांनी सहकार्य केले. याप्रकरणी आरोपीस दोषी धरून भा. दं. वि. कलम ३७६, ३७६ (२) (आय) (जे), ३७६ (३) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ६ नुसार दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरी व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा पी. केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले.

Web Title: 20 years hard labor for the accused in the case of abused of an eight-year-old girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here