Home औरंगाबाद Murder: सक्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

Murder: सक्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

Aurangabad Murder News: मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना.

Sakhya Jave was Murder with an ax on his head

औरंगाबाद:  औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अनिता संतोष लांडे (वय 47 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून, मनिषा काकासाहेब लांडे (वय 44 वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील लांडे कुटुंब माहुली शिवारात गट क्रमांक 13 मध्ये वास्तव्यास आहे. घरात अनिता संतोष लांडे व मनिषा काकासाहेब लांडे या दोघी सख्ख्या जावा असून यातील मोठी अनिता या अपंग आहेत. तर लहान मनिषा मनोरुग्ण असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. सोमवारी रात्री मनिषाचे स्वत: वरील संतुलन सुटल्याने, हातात धारदार शस्त्र (कुऱ्हाड) घेऊन थोरल्या जाऊ अनिता संतोष लांडे यांच्या डोक्यात मारले. त्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Sakhya Jave was Murder with an ax on his head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here