Home Accident News पुणे नाशिक महामार्गावर  दोन वेगवेगळ्या अपघातांत 3 ठार, ५ गंभीर

पुणे नाशिक महामार्गावर  दोन वेगवेगळ्या अपघातांत 3 ठार, ५ गंभीर

Accident: खासगी प्रवासी वाहनांच्या झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली,  बसची तरुणांना धडक.

3 killed, 5 seriously in two separate accident on Pune Nashik highway

सिन्नर: पुणे महामार्गावर मोहदरी घाटासह नायगाव रोडवर मापारवाडी शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (२३ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली. भल्या सकाळी झालेल्या या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे.

मोहदरी घाटात सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी वाहनांच्या झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक – पुणे महामार्गावर मोहदरी घाटात नंबर प्लेट नसलेले मॅक्स सवारी हे खासगी प्रवासी वाहन नाशिकहून सिन्नरकडे येत होते. मोहदरी घाट चढताना सुरुवातीच्याच वळणावर ओव्हरटेक करताना प्रवासी वाहनाने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. यामुळे वाहनाच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

अपघातात शारदा मोरे (४५, रा. उद्योग भवन, सिन्नर) या महिलेच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष गडाख (४४), मनीषा मुकेश सावंत (४०), ललिता प्रभाकर जाधव (५०), पुष्पा प्रदीप खंडारे (४७, रा. सर्व नाशिक रोड) व शोभा कैलास शिंदे (४५, रा. देवळाली गाव ) हे ५ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी महामार्ग व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिकाचालक गणेश काकड, गणेश गायकवाड, अजित सहाणे यांनी तात्काळ घटनास्थळी येत जखमींना सिन्नरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

बसची तरुणांना धडक

दुसऱ्या घटनेत सकाळच्या सुमारास पल्सर दुचाकी (एमएच १५ एचएल ३२९८ ) ने दोन तरुण माळेगाव येथून सिन्नरकडे येत असताना मापारवाडी शिवारात समोरून येणारी मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयाची बस (एमएच १५, एके १४४३) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ज्ञानेश्वर राजेंद्र भारस्कर (२४, रा. कोनांबे) व अनिकेत नंदू खताळे (रा. करोळे, ता. इगतपुरी) या दोन्ही तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: 3 killed, 5 seriously in two separate Accident on Pune Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here