Home क्राईम Rape: तरुणीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार, व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी, गर्भपाताचा प्रयत्न

Rape: तरुणीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार, व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी, गर्भपाताचा प्रयत्न

Rape Case:  तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला, धमकी देत चार महिने अत्याचार.

Rape of a young woman by giving gungi medicine, threatening to make the video viral

बदलापूर: बदलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडियो काढण्यात आला. या घटनेचा व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर चार महिने अत्याचार करण्यात आला. विशेष म्हणजे पिडीत तरुणी गर्भवती राहिल्यावर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यातआली आह. यातील मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. बलात्काराच्या गुन्हयासह एट्रॉसिटी कायद्याअंतर्गही बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हे संतापजनक कृत्य एका आदिवासी तरुणीसोबत घडलंय. शमशान अन्सारी असं या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे एकाच कारखान्यात कामाला होते. याच दरम्यान पीडित तरुणीच्या जेवणात गुंगीच औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अन्सारी यांनी तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान अत्याचाराचा व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित तरुणीवर चार महिने अत्याचार करत होता.

पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने अन्सारी याचे मित्र सागर कदम आणि मुकेश दिनगर यांनी तिचा रुग्णालयात येऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीच्या तक्रारीनंतर हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी बलात्कार, गर्भपात करण्याचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी अन्सारी हा अजूनही फरार आहे, तर गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Rape of a young woman by giving gungi medicine, threatening to make the video viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here