Home नाशिक निवासी विद्यालयात गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू, इतर गंभीर

निवासी विद्यालयात गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू, इतर गंभीर

Igatpuri News: इगतपुरीमधील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयातील धक्कादायक प्रकार घडला, poisoned  दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू.

Aggressive students poisoned at residential school, two dead

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इगतपुरीमध्ये गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. इगतपुरीमधील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयातील धक्कादायक प्रकार घडला आहे.

नाशिकच्या इगतपुरीमधील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेत उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. सदर विद्यार्थ्यांचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना उलट्या होऊन मृत्यू झाला आहे.

सदर घटनेत हर्षल गणेश भोईर, वय २३, रा.भिवंडी, जि. ठाणे आणि मोहम्मद जुबेर शेख,११ रा. नाशिक या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रथमेश निलेश बुवा वय १७ आणि देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण इगतपुरीमधील अनुसयात्मजा गतीमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते . मात्र, हे जेवण केल्यानंतर विद्यालयातील गतीमंद विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. जेवण किंवा पाणी प्यायल्यानंतर विद्यालयातील ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.

सदर विद्यार्थ्यांमधील दोन जणांचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर चार विद्यार्थ्यांवर इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील उपचार सुरू आहेत. सदर घटनेने गतीमंद निवासी विद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Aggressive students poisoned at residential school, two dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here