Home संगमनेर संगमनेर शहरात खळबळ: प्रसाद लॉजमध्ये ३० वर्षीय तरुणाने जाळून घेत केली आत्महत्या-...

संगमनेर शहरात खळबळ: प्रसाद लॉजमध्ये ३० वर्षीय तरुणाने जाळून घेत केली आत्महत्या- Suicide

30-year-old man commits suicide by setting himself on fire in Prasad Lodge Sangamner

Sangamner | संगमनेर: संगमनेर शहरातील प्रसाद लॉज मधून खळबळजनक घटना समोर आली आहे.  संगमनेर शहरातील प्रसाद लॉज मध्ये देवपूर जिल्हा धुळे येथील ३० वर्षीय तरुणाने लॉजमध्ये स्वतःला जाळून (Fire) घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सागर रघुनाथ ठाकरे रा. ओम नगर किरण सोसायटी देवपूर, जिल्हा धुळे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसापासून हा युवक या लॉजमध्ये रूम घेऊन राहत होता दरम्यान गुरुवारी मध्यरात्री त्याने रूम चा  दरवाजा बंद करत स्वतःला या रूममध्ये पेटून घेतलं, सकाळी लॉजमधील दरवाजातून धूर येत असल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता या आगीत या तरुण जळून गेला होता.

हा तरुण युवक उच्चशिक्षित असून घरगुती वादातून त्यांने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख , उपनिरीक्षक निकिता महाले, राजेश गायकवाड, सचिन उगले यांनी भेट देत मयत युवकाचा मृतदेह संगमनेरच्या कुटर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे . मयत युवकाची सासुरवाडी संगमनेर मधील असल्याची माहिती मिळत आहे.  आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती, चिट्ठी सह इतर सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, दरम्यान या तरुणाने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे.

Web Title: 30-year-old man commits suicide by setting himself on fire in Prasad Lodge Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here