Home पुणे Rape | महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो पतीला पाठवून बदनामी

Rape | महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो पतीला पाठवून बदनामी

Defamation by raping a woman and sending pornographic photos to her husband

पिंपरी | Pimpri: एकत्र शिक्षण घेत असताना झालेल्या ओळखीतून मैत्री झाली अन मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत महिलेचे नग्न फोटो (Porn Photo) काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच त्यानंतर तिचे अश्लील फोटो पतीला पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश पांडुरंग करगळ वय २६ रा, चांदोर ता. भूम जि. उस्मानाबाद याला अटक केली आहे. सदर प्रकार थेरगाव व वाकड येथील हॉटेलमध्ये २२ एप्रिल रोजी २०२२ रोजी घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला व आरोपी हे औरंगाबाद येथे एमसीए चे चे शिक्षण एकच ठिकाणी घेत होते. त्यांच्या ओळखीतून मैत्री झाली. त्यानंतर ते वाकड येथे प्रवेश परीक्षा देण्यासाठी आले होते. यावेळी वाकड येथील हॉटेलमध्ये अविनाश हा घेऊन गेला. तिथे तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित केले. तेथे त्याने दोघांचे एकत्रित नग्न फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शरीर सुखाची मागणी केली. मे २०२२ रोजी थेरगाव येथील फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारिरीक संबध प्रस्थापित केले. तसेच वारंवार बोलावून शारीरिक संबंध (Sex) ठेवले. फिर्यादी यांचे अर्ध नग्न फोटो फिर्यादीच्या पतीला पाठवून बदनामी केल्याने पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

Web Title: Defamation by raping a woman and sending pornographic photos to her husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here