Home नाशिक मित्रांची चेष्टामस्करी पडली महागात, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

मित्रांची चेष्टामस्करी पडली महागात, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Breaking News | Nashik Crime : गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू.

5-year-old boy died after being hit on the genitals

नाशिक: मैत्री म्हटली की, त्यात चेष्टामस्करी आलीच. मात्र चेष्टामस्करीची घटना मृत्यूच्या घरात घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे.  थट्टा मस्करी दरम्यान गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रशांत सुनील झिनवाल (19, रा. जुनी स्टेशनवाडी, पवारवाडी, देवळाली कॅम्प) यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 7 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिल्टरेशन प्लांटजवळ मोबाईल खेळत होते. त्यावेळी समोरुन आरोपी सोन्या, मोहीत, सुमित व लवनित हे चौघे जण जात होते. त्यावेळी सुमित आणि लवनित यांच्यामध्ये काही तरी कारणावरुन चेष्टा मस्करी सुरू झाली.  त्यात लवनितने सुमितला डोक्यात मारले. त्यानंतर सुमितने लवनितच्या पोटात दोन बुक्के मारुन त्याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर सुमितने लवनितच्या गुप्त भागावर हाताचा कोपरा मारला. त्यात लवनित किरणकुमार भगवाने (15, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) हा जागीच बेशुद्ध झाला. म्हणून मोहीत व सुमित यांनी त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र उपचार सुरू असताना लवनितचा मृत्यू झाला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी प्रशांत झिनवाल यांनी ही माहिती त्याची मोठी आई संगिता झिनवाल यांना सांगितली. त्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सुमित विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.

Web Title: 5-year-old boy died after being hit on the genitals

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here