Theft: घारगावात चोरट्यांचा धुमाकूळ दागिने लंपास

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना बुधवार दि. १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे,
याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव येथील महमंद गफूर शेख यांचे शेतामध्ये घर आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी घरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सर्व साहित्य उचकटून खाली फेकून दिला. यावेळी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पळून गेले. त्यानंतर चोरटे हे गावातील माधव पुंजाहारी धात्रक यांच्या घराकडे गेले. धात्रक यांच्याही घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.कपाट उचकटून सर्व साहित्य फेकून देत पत्र्याची पेटीही उचकटून बाहेर फेकून दिली. समोरच विठाबाई धात्रक झोपलेल्या होत्या. त्यांच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. यावेळी त्या झोपेतून जाग्या होत चोरट्याशी झटापट झाली. त्यांच्या हाताला ओरबाडले आणि तिला ढकलून देत तेथून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी चोरट्यांचा तातडीने शोध लावावा अशी मागणी केली आहे. घारगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Theft are rampant in Ghargaon















































