Home अहमदनगर चार हजारांचे इंजेक्शन १८ हजाराला विक्री, दोघांवर गुन्हा दाखल

चार हजारांचे इंजेक्शन १८ हजाराला विक्री, दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Four thousand injections sold for 18 thousand

अहमदनगर | Ahmednagar: भिंगार येथे रेमडेसीविर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्रीचे प्रकरण ताजे असतानाचा आणखी एक प्रकरण समोर आले आहे. केडगाव येथील एका खाजगी कोव्हीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हे इंजेक्शन चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

रेमडेसीविर इंजेक्शन चार हजार रुपयांचे आणि त्याची विक्री तब्बल अठरा हजार रुपयांनी करणाऱ्या दोन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका नर्सचा समावेश आहे. ईशां राजू जाधव व शुभम विजय नांदुरकर रा. बुर्हाणनगर ता. नगर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी पहाटे शुभम नांदुरकर यास अटक केली आहे.

केडगाव येथील खासगी कोव्हीड सेंटर काम करणारे कर्मचारी चढ्या भावाने रेमडेसीविर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या विक्रीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार करून सापाला रचला. आरोपी त्याठिकाणी एक रेमडेसीविर इंजेक्शन घेऊन येताच रंगेहाथ पकडण्यात आले. एक रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्यांनी एका कोरोना मृत व्यक्तीच्या नावावर हे इंजेक्शन खरेदी करून चढ्या भावाने विक्री करत होते.

Web Title : Ahmednagar Four thousand injections sold for 18 thousand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here