Home अहमदनगर मुल बाळ होत नाही चटके देत विवाहितेचा छळ

मुल बाळ होत नाही चटके देत विवाहितेचा छळ

Kopargaon Persecution of a married woman

कोपरगाव | Kopargaon: तुला मुल बाळ होत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या नातेवाईकांकडून लग्नात झालेला  हजार रुपयांचा खर्च घेऊन ये या कारणावरून घरातील उलटणी गॅसवर तापवून तोंडावर, ओठावर, पाठीवर चटके देत क्रूर वागणूक दिल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे माहेर असलेली मात्र भुसावळ येथे सासर असलेल्या सविता हेमंत ठाकरे वय २२ हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पती हेमंत रमेश ठाकरे व सासू लताबाई रमेश ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनेवाडी येथील फिर्यादी महिला सविता ठाकरे हिचे लग्न पाच वर्षापूर्वी जळगाव येथील हेमंत ठाकरे यांचे बरोबर झाले. त्यांनी काही वर्षापासून त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यात नातेवाईकांकडून लग्नात झालेला खर्च घेऊन ये. तुला मुल बाळ होत नाही. स्वयंपाक येत नाही. असे म्हणून नेहमी लाथाबुक्क्यांनी काठीने मारहाण करून दुखापत केली.

Web Title: Kopargaon Persecution of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here