राज्यात १५ दिवस काय असेल सुरु आणि काय बंद जाणून घ्या
Maharashtra Lockdown: राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ पासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ अर्थात संचारबंदी लागू राहील. अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती अथवा संस्था वगळता सर्व आस्थापना बंद राहतील योग्य कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही.
काय असेल बंद:
चित्रपट गृह, नाट्य गृह, सभागृह
व्हिडियो गेम पार्लर तसेच करमणूक केंद्र
वाटर पार्क
क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुल,
चित्रपट, नाटक, जाहिरातीचे चित्रीकरण
सर्व दुकाने, मोळ, शॉपिंग सेंटर(जि अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नाही.)
सार्वजनिक ठिकाणे, समुद्र किनारे, बगीचे मैदाने
सर्व धार्मिक स्थळे,
केश कर्तनालय, ब्युटी पार्लर
शाळा महाविद्यालये (दहावी बारावीसाठी लागणारे मनुष्यबळ)
सर्व कोचिंग क्लासेस
धार्मिक राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी
काय राहणार सुरु:
रुग्णालये, मेडिकल, लसीकरण, वितरण वाहतूक सेवा
पशु दवाखाने आणि त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने
किराणा, भाजीपाला, फळे दुध डेअरी,बेकरी
शीतगृहे आणि गोदाम
सार्वजनिक वाहतूक
विविध देशांचे राजनयिक कार्यालय दूतावास
मान्सूनपूर्व कामे
सार्वजनिक प्रशासनाच्या सार्वजनिक सेवा
रिझर्व बँक ऑफ इंडिया निर्दर्शीत केलेल्या अत्यवश्यक सेवा
सेबीची कार्यालये
दूरसंचार सेवा सुरळीत ठेवण्यासाठी लागणारी यंत्रणा
सामानाची वाहतूक व पाणीपुरवठा
शेती आणि शेतीविषयक सेवा
सर्व वस्तूंची आयात व निर्यात
अत्यावश्यक सेवा ई कॉमर्सला परवानगी
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना परवानगी
सर्व कार्गो सेवा
पावसाळी साहित्याची निर्मिती
पायाभूत सेवांसाठी कार्यरत असणारे डाटा सेंटर आय टी. सेवा
पेट्रोल पंप
सरकारी व खासगी सुरक्षा व्यवस्था
विद्युत आणि गस पुरवठा केंद्र
एटीएम
पोस्ट सेवा
बंदरे आणि निगडीत सेवा
औषधे व लस वाहतूक सेवा
अत्यावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची निर्मिती आणि वाहतूक
आपती व्यवस्थापन विभागाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेल्या सेवा
Web Title: Maharashtra Lockdown what is strated and Closed