अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच: वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून येत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २४०५ रुग्ण वाढले आहे. मंगळवारी सुद्धा २६५४ रुग्ण आढळून आले होते.
नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. जिल्हा शासकीय प्रयोगशाळेनुसार ५५६, खासगी प्रयोगशाळेत ५१७ आणि रॅपिड चाचणीत १३३२ जणांना करोनाची लागण झाली आहे. नगर शहरात बेड फुल झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी.
आज प्राप्त झालेल्या अहवालात तालुकानिहाय आकडेवारी: मनपा ४९४, राहता १८४, कोपरगाव २८९, संगमनेर १३६,, श्रीरामपूर ६६, कर्जत २७९, नगर ग्रामीण २८८, राहुरी ११७, पाथर्डी १७७, अकोले १२६, शेवगाव १६८, पारनेर १२१, नेवासा ४७, श्रीगोंदा ५२, जामखेड ९ असे २४०५ रुग्ण आढळून आले आहेत. आज ११२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १,०६,२२१
सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण: १५५१७
एकूण मृत्यू: १३६६
एकूण संख्या: १,२३,१०४
Web Title: Corona blast continues in Ahmednagar