लिप्ट मागून वाहनचालकांना लुटणारी महिला अटकेत
अहमदनगर | Ahmednagar: दिल्ली गेट ते एमआयडीसी रस्त्या दरम्यान दुचाकी, टेम्पो चालक यासारख्या अन्य वाहनचालकांकडून लिप्ट मागत नागरिकांना लुटणारी भामटी महिला काही जागृत तरुणांनाच्या दक्षतेमुळे तोफखाना डीबी पोलिसांच्या हाती लागली आहे.
ही भामटी महिला मोठ्या व्यक्तीची ओळख किंवा वकील असल्याचे सांगून लिफ्ट देणारयाला दमदाटी करून पोलीस ठाण्याची भीती दाखवून शिवीगाळ दमदाटी करत लुटत असल्याची माहिती मिळाली.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे इन्चार्ज सपोनि समाधान सोळंके यांच्या सूचनेनुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचत भामट्या महिलेस पकडले.
मंगळवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास एक गृहस्थ आपल्या टेम्पोमध्ये फर्निचरचे सामान घेऊन एमआयडीसीकडे जात होते. यावेळी टीव्हीएस शोरूमजवळ ती भामटी महिला उभी होती. या दरम्यान टेम्पो चालक पाणी पिण्यासाठी थांबला असता त्या भामट्या महिलेने त्या टेम्पो चालकाला मला हुंडेकरी शोरूमजवळ सोडा असे सांगितले. यावेळी टेम्पोमध्ये फर्निचर असल्याने टेम्पोच्या पुढील सीटवर ही महिला बसली. हुंडेकरी शोरूम आल्याने या महिलेस टेम्पोवाला उतरा असे म्हणाला.यावेळी त्या भामट्या महिलेने मी कुणाच्या गाडीत फुकट येत नाही असे म्हणून त्या महिलेने ५०० रुपयांची नोट दाखवली. टेम्पो चालकाने ५०० सुट्टे नसल्याचे सांगितले. यावर भामटी म्हणाली माझ्याकडील ह्या २०० रुपयांच्या तीन नोटा घ्या आणि ५८० रुपये परत द्या. त्यावेळी टेम्पो चालक म्हणाला हा कोणता हिशोब. २० रुपये सुट्टे द्या. तेव्हा ती म्हणाली मी तुला पोलीस स्टेशनाला घेऊन जाईन. मी कोर्टात क्लास वन अधिकारी आहे. असे म्हणत हुज्जत घातली. त्या भामट्या महिलेने शिवीगाळ दमदाटी करत टेम्पो चालकाकडून १७०० रुपये काढून घेतले. तसेच त्याच दिवशी एका दुचाकीवर लिप्ट मागून तरुणाला १५०० रुपयांना लुटले. काही जागरूक तरुणांच्या सतर्कतेमुळे ती भामटी महिला तोफखाना डीबी पथकाने पकडली आहे.
Web Title: Ahmednagar Woman arrested for robbing driver