Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना कमी झाला मात्र म्युकरमायकोसिसचा धोका कायम

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना कमी झाला मात्र म्युकरमायकोसिसचा धोका कायम

Ahmednagar News corona decreased but the risk of mucormycosis

अहमदनगर | Ahmednagar News:  जिल्ह्यात कोरोनाबरोबर आलेला म्युकरमायकोसिसचा हा आजार धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी कमी होत आहे. तसे आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र म्युकरमायकोसिसचानवे संकट येऊन ठाकले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३० रुग्ण आढळून आले आहेत. यामधील १७ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर ८२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १३१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. म्युकरमायकोसिस आजारात १६६ पुरुष तर ६४ महिला बाधित झाल्या आहेत. कोरोनापाठोपाठ या आजाराने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हे लक्षणे दिसून येत आहे. म्युकरमायकोसिसचे लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

Web Title: Ahmednagar News corona decreased but the risk of mucormycosis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here