Home अकोले भंडारदरा: तु फार चांगली दिसतेस म्हणत महिलेस मिठी मारून विनयभंग

भंडारदरा: तु फार चांगली दिसतेस म्हणत महिलेस मिठी मारून विनयभंग

Akole news look very good, hugging a woman and humiliating

राजूर | Akole News: श्रीरामपूर तालुक्यातील पर्यटकांनी तु फार चांगली दिसतेस एका महिलेस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याची तसेच दोन हॉटेल चालकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारदरा परिसरातील नाणी फॉल येथे घडली.

अकोले तालुक्यात पर्यटकांची गर्दी दिवसेदिवस वाढत आहे. मात्र मद्यपी व्यसनाधीन तरुण पर्यटकांकडून स्थानिक नागरिक, पोलीस, दुकानदार यांच्यावर हल्ले होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिक व पोलिसांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाचा श्रीरामपूर येथील तरुणांनी दोन हॉटेल चालकांना मारहाण तसेच महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातून आलेल्या पर्यटकांनी थेट एका महिलेला तू फार चांगली दिसते असे म्हणत मिठी मारुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या महिलेने त्यांना विरोध केल्याने तिचा बुचूडा धरुन समोरच्या टेबलावर आपटण्याचा प्रकार घडला.  तसेच टपरीतील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढईतील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉलमधील सामानाची नासधूस करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी श्रीराम केशव जंगले (वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर), अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28 रा. श्रीरामपूर), उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर), सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर), वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर), विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक.नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार करत आहेत.

Web Title: Akole news look very good, hugging a woman and humiliating

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here