Home क्राईम संगमनेर: विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

संगमनेर: विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

Sangamner Caught a tractor transporting unlicensed sand

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे विनापरवाना वाळूची चोरी करणारा ट्रॅक्टर अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडण्यात याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्याकडून दहा हजार रुपयांची वाळूसह पाच लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिसांनी अमोल ज्ञानेश्वर गोदाडे रा. राजापूर, चिमा सूर्यवंशी रा. कासारा दुमाला यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 374/2021 भारतीय दंड संहिता कलम 379, 34 पर्यावरण कायदा कलम 3 /15 अन्वये दाखल केला आहे. अमोल गोदाडे यास अटक करण्यात आली असून चिमा सूर्यवंशी हा फरार झाला आहे, अधिक तपास  तपास विजय खाडे करीत आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन अडवल यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे वाळूची चोरी होत असल्याची माहिती अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: Sangamner Caught a tractor transporting unlicensed sand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here