Home अहमदनगर अहमदनगर: वीज प्रवाह उतरल्याने ९ म्हशींचा मृत्यू

अहमदनगर: वीज प्रवाह उतरल्याने ९ म्हशींचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: गोठ्यातील गव्हाणीच्या अँगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने भेंड्यात ९ म्हशींचा मृत्यू; दहा लाखांचे नुकसान.

9 buffaloes died due to electric Shock

भेंडा: नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या ९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक येथील फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांचे राहते घर व म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या एका ओळीत एकूण १२ म्हशी बांधलेल्या होत्या. बुधवार दि.१५ मे रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी अँगलमध्ये वीजप्रवाह उतरून ज्ञानदेव दानियल शिरसाठ यांच्या ५ तर शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या ४ अशा एकूण ९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. उर्वरित ३ म्हशी बचावल्या आहेत. ९ पैकी ७ गाभण तर २ दुभत्या होत्या. या घटनेने शिरसाठ कुटुंबियांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महसूल, पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. फुलारीवस्तीवरून लांडेवाड़ी येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सदर झालेल्या घटनेतील म्हशींना वाहून नेण्यात आले. त्यासाठी प्रदीप लक्ष्मण फुलारी यांनी जेसीबी व टिपरची मदत केली.

मृत म्हशींचे शवविच्छेदन केल्यानंतर ग्रामपंचायत मालकीच्या जागेत त्या पुरण्यात आल्या. नेवासा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. तेजस घुले, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ कुकाणा पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल गायकवाड व सहाय्यक ज्ञानदेव गरड यांनी मृत म्हशींचे शवविच्छेदन केले.

दरम्यान आपदग्रस्त शिरसाठ कुटुंबियांना भेंडा ग्रामस्थाकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शासनानेही तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: 9 buffaloes died due to electric Shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here