Home अहमदनगर घरात एकटीच असताना घरात घुसून महिलेचा विनयभंग

घरात एकटीच असताना घरात घुसून महिलेचा विनयभंग

Breaking News | Ahmednagar:  एक ३० वर्षीय महिला घरात एकटीच असताना आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य.

woman was molested by breaking into the house when she was alone in the house

राहुरी: एक ३० वर्षीय महिला घरात एकटीच असताना आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना राहुरी तालुक्यात दि. १४ मे रोजी घडली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील एका गावात राहणारी ३० वर्षीय महिला १४ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान घरात एकटीच होती. तेव्हा अंबादास डुकरे हा सदर महिलेच्या घरात घुसला. त्याने तू मला खूप आवडते असे म्हणून सदर महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. नंतर तू जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. घटनेनंतर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अंबादास राजाराम डुकरे, रा. गुहा, ता. राहुरी याच्यावर कलम ३५४ प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके करीत आहेत.

Web Title: woman was molested by breaking into the house when she was alone in the house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here