Home संगमनेर संगमनेर: दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी

संगमनेर: दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी

Breaking News | Sangamner: दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना.

Young man seriously injured after falling from bike

संगमनेर : दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी (दि.१३) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जावळे वस्ती परिसरात घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बाळू वाळुंज (वय २५, रा. गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर) हा आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. १७ सी.एल. ४६०२) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. तालुक्यातील चंदनापूरी घाटा जवळील जावळे वस्ती परिसरात त्याची मोटरसायकल रस्त्यावर पडली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Young man seriously injured after falling from bike

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here