Home संगमनेर संगमनेर: पाच जणांना गंभीर मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: पाच जणांना गंभीर मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: पाच जणांपैकी दोघांना कुऱ्हाडी व लाकडी दांड्याने तर उर्वरित तिघांना दगडाने व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना.

Five people were severely beaten, a case was registered against seven people

संगमनेर: तालुक्यातील हिवरगाव पठार येथे पाच जणांपैकी दोघांना कुऱ्हाडी व लाकडी दांड्याने तर उर्वरित तिघांना दगडाने व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की गौतम विष्णू भालेराव (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांची बहीण कविता नितीन मिसाळ यांचे जावेबरोबर भांडण झालेले होते. या कारणावरून गैरकायद्याने जमाव गोळा करून गौतम भालेराव व जितेंद्र भालेराव यांना विलास मिसाळ, एक तरुण व मंदा विलास मिसाळ यांनी शिवीगाळ व दमदाटी करून कुऱ्हाडी व लाकडी दांड्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. तर सोनाबाई मिसाळ, वैशाली विजय मिसाळ, दोन तरुण यांनी आई सुमन विष्णू भालेराव, बहीण कविता नितीन मिसाळ व मेहणा नितीन रामू मिसाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी आणि दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले.

याप्रकरणी जखमी गौतम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात आरोपींवर घारगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. आर. व्ही. भूतांबरे करत आहेत.

Web Title: Five people were severely beaten, a case was registered against seven people

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here