Home अहमदनगर अहमदनगर: आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अहमदनगर: आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना.

youth committed suicide by hanging himself from a mango tree

अहमदनगर: आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. रोहन शिवाजी घुंगार्डे (वय २०, रा. चास ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सदरची घटना शनिवारी (दि. ११) सकाळी चास शिवारात घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहन घुंगार्डे याने त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्याला उपचारासाठी त्याचे चुलते दीपक किसन

घुंगार्डे यांनी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले. तशी माहिती रुग्णालयात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार जठार यांना दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून रोहन याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार धनवडे करत आहेत.

Web Title: youth committed suicide by hanging himself from a mango tree

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here