Home अहमदनगर नगर, शिर्डीमध्ये किती झाले मतदान? कसा आहे प्रतिसाद | Loksabha Election

नगर, शिर्डीमध्ये किती झाले मतदान? कसा आहे प्रतिसाद | Loksabha Election

Breaking News | Ahmednagar Loksabha Election 2024: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाला संमिस्र प्रतिसाद.

How much voting was done in Nagar, Shirdi lok Sabha Election

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी सात ते अकरापर्यंत १४.८५ टक्के मतदान झाले. १ लाख ९५ हजार ७९६ पुरुष तर ९८ हजार ५९६ महिला मतदारांनी बजावला हक्क बजावला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाला संमिस्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या दोन तासात सहाही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६.४१ टक्के मतदान  झाले. मतदा्रांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह दिसत नाही.

आज सकाळी ७ वाजता प्रत्येक्षात मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण भागात किरकोळ अंतरात रांगा दिसून आल्या. सकाळी ९ अखेर अकोले विधानसभा मतदारसंघात ६.५ टक्के, संगमनेर १०.८७ टक्के, शिर्डी ५.८५ टक्के, कोपरगाव ५.११ टक्के, श्रीरामपूर ५.१७ टक्के, तर नेवासा ५ टक्के असे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी पहिल्या दोन तासात ६.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: How much voting was done in Nagar, Shirdi lok Sabha Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here