Home संगमनेर संगमनेर: तब्बल २० तासानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

संगमनेर: तब्बल २० तासानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

Breaking News | Sangamner:  गुंजाळवाडी परिसरातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

After almost 20 hours, the leopard that fell in the well was successfully rescued

संगमनेर : भक्षाच्या शोधात भटकंती करत असताना तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील एका खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल २० तासानंतर बाहेर काढण्यात वन खात्याला यश आले. वन खात्याने अनेक प्रयत्न करून काल रविवारी (दि.१२) सायंकाळी या बिबट्याला विहिरी बाहेर काढले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याची संख्या वाढली आहे. भक्षाच्या शोधात या बिबट्याची भटकंती सुरू असते. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातही काही बिबटे फिरतात. यातील एक बिबट्या शनिवारी रात्री भक्षाच्या शोधासाठी फिरत होता. गुंजाळवाडी परिसरातील वेल्हाळे रोडवरील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ नामदेव गुंजाळ यांच्या शेतातील विहिरीमध्ये हा बिबट्या अचानक पडला होता. दरम्यान, बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती समजल्याने ग्रामस्थांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळविण्यात आली. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. हा बिबट्या ज्या विहिरीमध्ये पडला होता. त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी होते.

Web Title: After almost 20 hours, the leopard that fell in the well was successfully rescued

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here