Home अकोले अकोले: कोल्हार घोटी रोडवर जीप उलटली; तरुण  ठार

अकोले: कोल्हार घोटी रोडवर जीप उलटली; तरुण  ठार

Breaking News | Akole: केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू.

Jeep overturns on Kolhar Ghoti Road youth died

राजूर : कोल्हार घोटी रोड वर केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवते (वय: २०, रा. अकोले) हा तरुण जागीच ठार झाला. तर इतर चार जण जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत रूपवते हा अकोले तालुक्यातील रंधा येथे आपल्या नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यानंतर तो आपल्या चार मित्रांसह एम.एच. ०५ ए.एक्स ०८६५ ही जीप घेऊन रंधा येथून राजूर येथे गाडी धुण्यासाठी घेऊन येत होते. केळुंगण शिवारात गाडी आल्यानंतर तिची स्टिअरिंग लॉक झाली आणि जीप पलटी झाली. यात संतोष रूपवते या युवकाचा मृत्यू झाला. स्वप्निल दिवे (राजूर), पारस पराड (खिरविरे), अनिकेत सोनवणे (शिंगणवाडी), सागर पवार (रंधा) हे चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आपले कर्मचारी अशोक गाडे, विजय मुंढे, राकेश मुलाणी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.  पंचनामा करून मयत रूपवते याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला होता. राजूर पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Jeep overturns on Kolhar Ghoti Road youth died

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here