Home नागपूर मान्सूनची आनंदवार्ता; १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात

मान्सूनची आनंदवार्ता; १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात

Breaking News | Monsoon Update: महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन १० ते १२ जूनपर्यंत होण्याचा अंदाज. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालींवरून मिळाले संकेत.

Good News of Monsoon In Maharashtra till 12th June

नागपूर : मे महिन्यातील तीव्र उकाडा व अवकाळीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन १० ते १२ जूनपर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होत असून, नागपुरात १२ जूनपर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थिती आहे, तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे. ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

कशी घेणार एन्ट्री?

सध्याची स्थिती कायम राहिल्यास याच आठवड्यात म्हणजे १९ मेपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पाऊस देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२८ मे पर्यंत केरळमध्ये

नैर्ऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो. मात्र, सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजे २७ ते २८ मेदरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर १० ते १२ दिवसांत तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल, असा अंदाज आहे.

पावसाची शक्यता : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Web Title: Good News of Monsoon In Maharashtra till 12th June

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here