संगमनेरात धूमस्टाईलने चोरी, महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडले
Breaking News | Sangamner: दोघा सोनसाखळी चोरांनी रस्त्याने पायी जात असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेले.
संगमनेर: संगमनेर शहरात महिलांच्या गळ्यातील सोने ओरबाडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. दुचाकीहून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरांनी रस्त्याने पायी जात असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) संध्याकाळी ७ ते ७:३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्यनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीनाक्षी मच्छिंद्रनाथ सोनवणे (वय ७८, रा. गल्ली क्रमांक १, शिक्षक कॉलनी, चैतन्यनगर, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा सोनसाखळी चोरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. चैतन्यनगर येथील रहिवासी असलेल्या सोनवणे या घराजवळून पायी जात होत्या, त्यावेळी समोरून काळ्या रंगाची दुचाकीहून भरधाव आलेल्या दोघांनी सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून ते निघून गेले.
Web Title: Sangamaner Dhoomstyle stole, scratched the knot in the woman’s neck
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study