संगमनेर: लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत एकाची आत्महत्या
Breaking News | Sangamner: शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोराच्या साहाय्याने गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोराच्या साहाय्याने गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. . भागवत बाळा दिघे (वय ४५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तळेगाव दिघे येथील भागवत बाळा दिघे यांचा मृतदेह तळेगाव शिवारातील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत पोलीस पाटील अनिल कांदळकर यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे, दत्तात्रय बडदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह झाडावरून खाली घेतला व सायंकाळच्या सुमारास घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या का केली? याची अधिक माहिती मात्र मिळू शकली नाही. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे अधिक तपास करीत आहे. आत्महत्येच्या सदर घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
Web Title: man committed suicide by hanging himself from a lemon tree
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study