Home अहमदनगर संगमनेर शहरात हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू

संगमनेर शहरात हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: ३५ वर्षीय तरूणाने संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले.

young man died in a hotel in Sangamner city

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तरूणाने संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले. या घटनेने शहरासह घुलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

अमोल बाळासाहेब आगलावे असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मयत अमोल आगलावे हा शहरातील हॉटेल हिरामध्ये तीन दिवसापासून भाड्याने रूम घेऊन राहत होता. सोमवारी त्याने विषारी औषध सेवन केले. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी घातपाताची शक्यता वर्तविली असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहे. मयत अमोल आगलावे हा राजहंस दूधसंघात नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ, असा परिवार आहे.

Web Title: young man died in a hotel in Sangamner city

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here