Home पुणे धक्कादायक!  व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या

धक्कादायक!  व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या

Pimpri Chinchwad Crime: व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्याची घटना समोर.

businessman shot fire another businessman

पिंपरी- चिंचवड: शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शहरामधील चिखली परिसरात व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्याची (Firing) घटना समोर आली आहे.  या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय19, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणेला (रा. जाधववाडी, चिखली) अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेनं दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. सुदैवाने अजय फुले हा बचावला.

गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, मिळालेली माहिती अशी की,  जखमी झालेल्या अजयचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा तोच व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होता. त्यामुळे हर्षलने अजयला मारण्यासाठी कट रचला. शाम आणि लिलारे अजयच्या दुकानात येऊन वाद मिटवण्यासाठी गेले होते. चर्चा सुरु असतानाच हर्षल सुद्धा त्याठिकाणी आला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली. दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: businessman shot fire another businessman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here