Home नाशिक अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

Breaking News | Nashik: अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली.

after the Dead body of a minor girl was found in a well

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावातून दोन दिवसांपूर्वी राहत्या घरातून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा मृतदेह मोसम नदीच्या काठी असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहिरीत आढळून आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थ्यांनी नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: after the Dead body of a minor girl was found in a well

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here