Home अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यातील शिक्षक बेपत्ता

जिल्ह्यातील या तालुक्यातील शिक्षक बेपत्ता

Ahmednagar News Teacher missing

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बागडे वस्ती येथून एक शिक्षक घरात काहीही एक न सांगता घरातून बेपत्ता झाले आहे. तानाजी छबुराव गमे असे या शिक्षकाचे नाव आहे.

त्यांच्या पत्नी प्रतिभा तानाजी गमे यांनी राहता पोलीस ठाण्यात हरविल्याची खबर दिल्याने पोलिसांनी मिसिंग दाखल केले आहे. सौ. गमे यांचे पती दि. 21 जुलै 2021 रोजी सकाळी राहात्या घरातून कोणासही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत.

बेपत्ता असलेले तानाजी गमे हे 45 वर्ष वयाचे आहेत. त्यांची उंची 5 फूट 5 इंच, रंग गहू वर्ण, शरिराने सडपातळ, उजव्या डोळ्याचे खाली पडल्यामुळे जखम झालेली आहे. अंगात राखाडी रंगाचा शर्ट व काळे रंगाची पँट, पायात चप्पल, डोळ्याला चष्मा लावलेला आहे. तरी सदर व्यक्ती कुणास आढळल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस नाईक एस. बी. आवारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here