Home अहमदनगर गांधी दाम्पत्यासह संगमनेरचा पंडित याचा जामीन फेटाळला

गांधी दाम्पत्यासह संगमनेरचा पंडित याचा जामीन फेटाळला

Breaking News | Ahmednagar: नगर अर्बन बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाल्याबाबत गुन्हा.

Pandit of Sangamner along with Gandhi couple rejected bail

नगर : नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळ्यात दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा देवेंद्र दिलीप गांधी व सून प्रगती देवेंद्र गांधी यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी फेटाळून लावला. अटकेत असलेला संगमनेर येथील उद्योजक अमित पंडित याचाही न्यायालयाने जामीन नामंजूर केला.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात नगर अर्बन बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात देवेंद्र गांधी व प्रगती गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बँक बचाव समितीने आक्षेप घेतला होता.

अॅड. अच्युतराव पिंगळे यांनी स्वतंत्रपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गांधी दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गुन्ह्यात अटक असलेला उद्योजक अमित पंडित याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने फेटाळून लावला.

Web Title: Pandit of Sangamner along with Gandhi couple rejected bail

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here